Foot and Ankle Surgery

Foot and Ankle Surgery

diabetic-foot-care2
diabetic-foot-care-Marathi

In Marathi

diabetic-typographic-stamp-eps-vectors_csp53031632

In English

diabetic-foot-care-hindi

In Hindi

मधुमेहींच्या पायांची काळजी कशी घ्याल ?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे निदान होते. त्यावेळी त्याला संतुलित आणि पथ्थ्यांसह आहार घेण्याचा सल्ला दिला जातो त्यावेळी त्याला चालण्याचा व्यायाम करण्यावर भर देण्याची सूचना देखील केली जाते. मधुमेहाच्या रुग्णाने चालणे हे आवश्यक आहे यात शंका नाही. पण त्याशिवाय मधुमेहासह मधुमेहामुळे मज्जासंस्थेच्या आजारांमुळे पायांची कोणतीही दुखापत होणार नाही किंवा गुंतागुंत होणार नाही यासाठी पायाची कशी काळजी घ्यावी अथवा पायाचे आजार उद्भवणार नाही यासाठी काय टाळावेत हेही सांगितले जाते.

जगाची मधुमेहीची राजधानी म्हणून आता भारत पुढे येत आहे. भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक मधुमेही रुग्णांची संख्या आढळून येत आहे. मधुमेहाचा आजार हा नियंत्रित करता येणे शक्य पण तो कायमस्वरुपी बरा करता येत नाही. मधुमेहाचा आजार हा मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीच्या सोबतीला राहतो. म्हणजेच आजारामुळे त्या रुग्णाला मूत्रपिंडांचा संसर्ग, मज्जासंस्थेचा आजार, डोळ्यांचा संसर्ग होऊन नेत्रपटलांचा रोग यासारखे आजार उदभवतात. शरिरातील  नसांवर आजाराचा परिणाम झाल्यास त्याला न्यूरोपॅथी अर्थात मज्जासंस्थांचा रोग असे म्हटले जाते. त्याचा परिणाम अर्थात पायांवर होतो. कारण हा पाय हे देखील आपल्या शरिराचा एक भाग आहे.

 

मधुमेही मज्जासंस्थांचा रोग म्हणजे काय ?

दीर्घकाळापर्यंत मधुमेहाचा आजार जडला असल्यास त्याचा परिणाम शरिरातील शिरांवर (नसा) होतो. परिणामी, संवेदना, हालचालीच हरवून बसण्याचा धोका असतो. प्रामुख्याने शरिरातील शिरा या संवेदनासंदर्भातील महत्त्वाचा घटक मानलजा जातो. त्यामुळे स्पर्श, हालचाल, तापमान यांसदर्भात माहिती देण्यावर परिणाम होऊ शकतो. शरिराच्या कोणत्याही भागावर मधुमेहाचा परिणाम जेवढा होतो त्याच्या तुलनेत पायांवर होणारा परिणाम हा गंभीर ठरतो. तो सर्वाधिक नुकसानकारक मानला जातो.

 

आजाराचे कोणते परिणाम होतात?

 • जखमा होणे
 • अपंगत्व
 • त्वचेचे आणि नखांच्या समस्या
 • संसर्ग

–          जखमा होणे

तात्पुरता वरवरचा कमी प्रमाणातील स्पर्श, वेदनामुळे कधीही न दिसणारी जखम दिसून येते. अशा रुग्णांना स्वतःच्या जखमा खूप उशिरा कळतात किंवा इतरांच्या नजरेस त्या आल्या की त्यामुळे स्वतःला दिसून येतात. अचानक अशा जखमा दिसून आल्याने कधी कधी धडकी भरल्यासारखे होते.

मधुमेहींमध्ये अशा पायाच्या जखमा पूर्णपणे बरे होण्यास खूप कालावधी लागतो. कारण…

 • साखरेचे शरिरातील वाढत्या प्रमाणामुळे संसर्ग वाढण्यास अनुकूल होते.
 • रक्तपुरवठा कमी होऊ शकतो
 • संरक्षणात्मक संवेदना नष्ट होतात – जखमा झालेला भाग रुग्णाने जखम वाढण्यापासून संरक्षित केला अथवा त्याला धक्का लागण्यापासून दूर ठेवले तर लवकर बरी होऊ शकते. साधारण व्यक्तीला जखमा झाल्या की त्याच्या संवेदना जाणवतात. वेदना होताच त्या व्यक्तीने डॉक्टरांना दाखवून वेळोवेळी उपचार घेतल्यास अथवा त्यावर भार न दिल्यास त्या वेगाने बऱ्या होऊ शकतात.

–          चारकोट सांधे Charcot Joints

मधुमेही व्यक्तीला मज्जारज्जा संस्थेच्या रोगामुळे सांधे खऱाब होतात. त्यामुळे वेदना देखील होतात. अशा व्यक्ती वेदनामुळे अपंगत्व आल्यासारखे चालतात. अशाच सांध्यांना चारकोट सांधे असे वैज्ञानिक भाषेत म्हटले जाते. असे सांधे सुजल्यासारखे अथवा अपंगत्व आल्यासारखे दिसते. अशा सांध्यांना बूट अथवा कापडी पट्टा लावून आयुष्यभर राहणे आवश्यक राहण्याशिवाय पर्याय नसतो.

–          संसर्ग

मधुमेहींना जखमा झाल्या तर त्याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना त्वचेचा संसर्ग अथवा हाडांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्ग झाल्यानंतर ती जखम त्याच ठिकाण राहत अथवा त्या जखमेच्या संसर्गामुळे तिचा विस्तार वाढत जाऊन आयुष्यभर त्याच्या वेदना सहन कराव्या लागतात.. एखाद्या ठिकाणी झालेली जखम औषधोपचाराने बरी करता येते. त्यासाठी जखम स्वच्छ करणे, त्याच्यावर प्रतिबंधक औषधांचा वापर करून संसर्गाची तीव्रता कमी करता येते. परंतु, काही वेळा पायाच्या बोटांसह पाय, पावले यांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी झाकणे अथवा मलमपट्टी करण्याची गरज असते.

–          त्वचा आणि नखांच्या समस्या

 घट्टा (पायावरील टणक झालेला कातडीचा भाग) –

मधुमेही व्यक्तींना मज्जारज्जूसंस्थेच्या रोगामुळे साधाऱण व्यक्तीच्या तुलनते कमी संवेदना जाणवतात. प्रामुख्याने वरवरचा स्पर्श, तापमान, आणि सांध्याच्या रचनेतून एखाद्या गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी व्यक्तीला संवेदना होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संवेदना नष्ट होतात तेव्हा तो आपोआप त्याचे संरक्षण हरवून बसतो. साधारण सांध्याच्या संवेदना हरवतात त्यावेळी आपोआपच सांध्यावर ताण येतो. जेव्हा पायाच्या तळव्यावर स्वतःचे ओझे उचलणे अशक्य होते वजन पेलेनासे होते. त्यावेळी ते कमजोर झालेले असतात. त्यावेळी पायांना घट्टे येतात. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. यासाठी पायांच्या तळव्यावर येणारे वजन पेलण्यासाठी विशेष प्रकारचे बूट उपलब्ध असतात. त्याचा वापर करणे कधीही उपयुक्त ठरते.

मधुमेहीच्या रुग्णांना मज्जारज्जू संस्थेचा आजार जडावल्याने त्यांच्या त्वचेला रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी त्यांची त्वचा सुकल्यासारखी होते. पुढे जाऊन सुकलेल्या त्वचेचे रुपांतर त्वचेला भेगा अथवा तडे जाण्यात झाल्याचे दिसून येते. त्वचेला गेलेल्या भेगांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी व्हॅसलिन अथवा मॉइश्चरायझरचा वापर करून त्वचेला पडलेल्या सुरकुत्या अथवा भेगा नाहीशा करणे हाच त्यावर उपाय मानला जातो.

–          नखांचा संसर्ग

नखांचा संसर्ग होण्याचा अनेकदा धोका असतो. त्यामुळे नखे कापताना व्यवस्थित कापावेत. त्याबाबतची काळजी घ्यावी. कमीत कमी नखे कापणे टाळावे. कारण  पायाची बोटांची नखे वाढतात.

 

मज्जारज्जूसंस्थेच्या आजारांचे दुखणे कोणाला ?

प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाला मधुमेहाच्या मज्जारज्जू संस्थेचा आजार होतोच असे नाही. दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णाला मज्जारज्जू संस्थेचा आजार होतो. परंतु, मज्जारज्जू संस्थेचा आजार हा साखरेच्या नियंत्रणावर आधारीत असतो.

 

मज्जारज्जूसंस्थेच्या आजारावर उपचार काय?

मज्जारज्जूसंस्थेचा आजार हा बरा होत नाही. एकदा हा आजार बळावला तर प्रत्येक रुग्णाने त्यामुळे होणारी गुंतागुंत होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे. पायांचा अल्सरपासून मुक्तता मिळण्यासाठीच मज्जारज्जूसंस्थेच्या आजारावर उपचार करणे हाच उद्देश आहे.

 

तुमच्या माहितीसाठी…

ताण मज्जारज्जू संस्थेचा रोग = जखम

मज्जारज्जू संस्थेचा आजारावर उपचार होऊ शकतो.

जखमेवर उपचार कऱण्यासाठी त्यावर येणारा दाब अथवा ताण कमी करण्याची गरज आहे. साधारण व्यक्तीला वेदना झाल्या की तो व्यक्ती स्वतःच जखमेवर येणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो. जखमेवर येणारी सूज देखील कमी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, असे वारंवार झाल्यास जखमा बऱ्या करणे शक्य होत नाही. पायांना होणाऱ्या जखमा बऱ्या कऱण्यासाठी अथवा त्याला संरक्षण देण्यासाठी विशेष प्रकारचे बूट वापरणे हे फायद्याचे ठरते. तसेच विशेष प्रकारचे बुटातील सोलचा वापर करणे अपेक्षित आहे.

 

मज्जारज्जूसंस्थेचे व्यवस्थापन

उपचार करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी

मज्जारज्जूचा आजार असलेल्या मधुमेहींनी पायांची काळजी घेणे अपेक्षित असल्याचे समजून घ्यावे. मज्जारज्जूसंस्थेचा आजार बळावण्याची शक्यता असलेल्या रुग्णांसाठी पायांची काळजी कशी घ्यावी हे समजावून घेणे फायद्याचे आहे.

 • साखर नियंत्रित ठेवा.
 • नियमित चालते रहा. पण चालताना पाय उघडे ठेवू नका.
 • कॉटनचे सॉक्स वापरा.
 • पाण्याने पाय धुतल्यानंतर ओले पाय स्वच्छ करा.
 • पायांच्या बोटातील ओला भाग तसाच ठेवल्यास त्यामुळे बुरशीचा संसर्ग होण्याचा अथवा बोटांमध्ये अर्धवट भाग ओला राहण्याची शक्यता असते.
 • पायाच्या बोटांची हातांनी तपासणी करावी. हातांप्रमाणे पायाला अथवा बोटांना संवेदना जाणवतात की नाही याचे निदान करावे.
 • रुग्णाला स्वतःचे पायाचे तळवे पाहणे शक्य नसल्याने त्याने आरशाचा वापर करून पायांची स्थिती आणि त्यावर जखमा आहेत की नाही हे तपासून पाहावे. आरशाचा वापर करून पाहणे ते सोपे ठरेल.
 • रुग्णाच्या नातेवाईकांनी दर आठवड्याला रुग्णाच्या पायाची तपासणी करावी. त्याबबात डॉक्टरांकडे पाठपुरावा करून पायाच्या रचनेत काही बदल होत आहे का किंवा कसे याबाबत तपासून घ्यावे.
 • दररोज, आठवड्याने अथवा महिन्याने नेमके काय फरक जाणवतो ते पाहावे.
 • पायाला कठीण भेगा अथवा चिरा पडल्याचे दिसतात का ते तपासा.
 • एकदा झोपायला तुम्ही गेला तर त्यावेळी पायांना सुरकुत्या पडल्या असतील तर त्या मॉयश्चरायझर अथवा व्हॅसलिनचा वापर केला पाहिजे.
 • पायाच्या चपला, बूट नियमित तपासा. तुटलेल्या चपला, बूटामुळे देखील पायांना जखमा होण्याची शक्यता अधिक असते.
 • पायाच्या योग्य आकाराचा बूट अथवा चपला वापरा. शक्यता रात्रीच्या वेळा पायाच्या आकाराचा बूट, चपला खरेदी कारण रात्रीच्या वेळेला पाय सूजतात.
 • पायाच्या बोटांच्या ठिकाणी निमुळता आकार होत गेलेले बूट, चपला घेणे टाळा.
 • पायाला घट्टे अथवा चिरा झाल्यास त्या काढून टाकण्याचा स्वतःहून प्रयत्न करू नका. अनेकदा ते काढून टाकण्याची आवश्यकता देखील नसते.
 • अनेकदा खरेदी केलेल्या बुटाचा तळवा वजनामुळे पसरट होतो. त्यामुळे ते बरे होण्यास फायद्याचे ठरते.
 • अनेक वेळा घरात निर्जंतुकीकरण नसल्याच्या कारणामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
 • धूम्रपान टाळा. धुम्रपान आणि मधुमेह हे सर्वात चुकीचे समीकरण आहे. ते घातक ही ठरू शकते.

 

मधुमेहींमध्ये मज्जारज्जूंच्या आजारांची कोणती गुंतागुंत होऊ शकते ? 

 • बहुतांश वेळा जखमा बऱ्या होत नाहीत. काही महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत त्या तशाच राहतात.
 • संसर्गामुळे अस्थिमगजाचा दाह –हाडाच्या आतील बाजूपर्यंत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
 • पाय, पायाची बोटे, तळवे हे सातत्याने सॉक्स, मोजे वापरून झाकून ठेवणे आवश्यक असते. अन्यथा कधी कधी पायाची बोटे, पायाचा काही भाग अथवा पाय सुद्धा काढून पुढील आयुष्यासाठी काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो.

मज्जारज्जूसंस्थेच्या गुंतागुंतीबाबत सातत्याने जागृत राहणे हे गरजेचे असते. त्या करिता पायांची नियमित तपासणी आवश्यक आहे. यामुळे मधुमेहींना होणाऱ्या मज्जारज्जूसंस्थेच्या आजारांपासून दूर राहू शकतो.

How to take care of Diabetic Foot?

When a person is diagnosed to have diabetes- along with diet restrictions and medicines, he is advised to walk. No doubt diabetic patient should walk regularly but along with it, he should know what foot care needs to be taken to avoid complications resulting from Diabetes or Diabetic neuropathy.
India has become the capital of Diabetes in the world. We have the largest number of diabetic people. Diabetes is a disease which can be controlled but there is no cure. Hence when it is long-standing it is associated with some of the systemic complications like- Kidney affection- nephropathy, Eye affection- retinopathy. Similarly when it affects the nerves- its called as Neuropathy and usually, it affects feet- although it may affect other body parts also.

 

What is Diabetic Neuropathy?
Due to long-standing Diabetes nerves may get affected impairing their function like sensations or movements. Usually, its sensory components which will affect the sensations like superficial touch, temperature, joint position sense. It can affect any body part but feet are affected more often.

 

What are its ill effects
– Ulcer- wounds
– Deformity- Charcot’s joints
– Infections
– Skin and nail problems

 

 1. Ulcers / Wounds

Diminished superficial touch, temp, or pain will result in unnoticed injuries. Patients notice these injuries very late when others see their wounds or themselves when wounds are seen or palpated accidental.
These wounds take lot of time for Diabetics to heal because of
– Increased sugar levels- predisposing to infection
– Maybe decreased blood supply
– Loss of protective sensations

– due to which patient keeps on loading the injured part abnormally preventing the healing. Person with normal sensations when gets a wound

– due to the pain he reports early to the doctor, does not bear weight on it and takes the treatment on time so that the wound heals rapidly.

 

 1. Charcot Joints-

A diabetic person with neuropathy gets the destruction of joints without much pain. These joints are called as Charcot’s joints.They need to be protected in shoes or braces throughout life. In some cases, the deformities may need to be corrected with surgery to avoid ulcer formation. But even if they are operated lifelong support and care is needed.

 

 1. Infections

Wounds in Diabetics may get infected. There may be soft tissue infections or bony infections. Infections may remain local or may spread to become life-threatening
systemic infections. Local infections can be treated with debridements- i.e cleaning of wounds and antibiotics but to avoid life-threatening infections few times amputation of the
toe, foot or leg may be required.

 

 1. Skin and nail problems

Corns-
Patient with neuropathy has fewer sensations than normal. The common misconception in general population is corn results secondary to thorn rock or foreign body injury. But in Diabetics its Pressure callosity- means resulting from Pressure. Basically, the superficial touch, Temperature or joint position sensations are protective for the individual. Due to impaired joint position sense, the person starts loading the joint abnormally. The parts of the sole which are not supposed to bear weight if they are loaded- then it results in corns. They need not be excised with surgery as they will recur. Special footwear or special insoles are needed to redistribute the weight.

 

Cracks / fissures –

 

Diabetic neuropathy causes fewer secretions in the skin increasing the dryness of skin. Hence there is a tendency to form fissures or cracks on the sole. These cracks, later on, may become infected. It can be avoided by using moisturizer or Vaseline in the cracks before going to bed.

 

Nail bed infections –
There may be repeated nail bed infections which need to be taken care by cutting the nails properly. Avoid cutting the nails too short as it may result in ingrowing
toenails.

 

Who will suffer from neuropathy?
Not every diabetic patient will suffer from diabetic neuropathy. Usually, long-standing diabetics have diabetic neuropathy. Neuropathy is independent of the
sugar control.

 

What is the treatment of neuropathy?
Actually, there is no cure for neuropathy. Once neuropathy is developed every care should be taken to prevent the complications of neuropathy. The aim of
treatment is to keep the foot ulcer free and plantigrade.
Here it’s essential to know that

Pressure + Neuropathy = Wound

Neuropathy cannot be treated.
Hence to treat the wound we need to take away the pressure. In a normal person due to the pain he himself takes away the pressure by not waling on the wound, but in a neuropathy, person patient keeps walking on the wound. This repetitive trauma makes it difficult for the wound healing. Special shoes or insoles in the shoes are needed for the offloading.

 

Management of Neuropathy
Prevention is better than Cure.
We need to understand the foot care in people who have Diabetic neuropathy. It is also helpful for people who are prone to develop neuropathy.
– Maintain good control of blood sugar
– Walk regularly, but never walk Barefoot
– Wear cotton socks
– Take care to dry the feet completely after washing with water.
– Wet areas between toes will cause maceration and also fungal infection.
– One should always examine his feet with his hands as hands have better sensation than feet
– One may use the mirror with the handle to see the bottom part of the foot which is not easily seen in elderly patients.
– Family members should check feet of diabetic patients every weekend and periodic follow up with doctors will help to detect some early changes.
– What is to be seen on Daily, Weekly or monthly check?
– one should see if there are hard callosities, callosities or fissures.
– To avoid dryness or fissures while going to bed one may use moisturizer or Vaseline.
– To check the footwear regularly, as a damaged footwear may also be a cause for a wound.
– Pl buy a footwear of correct size ( Best to buy in the evening as feet are swollen in the evening)
– Avoid footwear with narrow toe box.
– If you note any corn or callosity please do not excise or remove on your own as many time it is not necessary to remove it.
– Custom made insoles will redistribute the load and they will heal on its own.
– Many times some interventions at home in nonsterile conditions may result in infections.
– Stop smoking. Diabetes and smoking is the worst combination for the feet.

 

What are Complications of Diabetic Neuropathy?
– Non-healing wounds- chronic non-healing ulcers over few months or years
– Osteomyelitis- infection of the underlying bone
– Amputation – removal of a toe and some part of a foot or leg may be necessary to salvage the limb or sometimes life also.

Hence, Regular checks, Proper footwear and awareness about the complications
of diabetic neuropathy are keys to success in prevention and treatment of
Diabetic Neuropathy.

डायबिटिक पैरों की देखभाल कैसे करें?

Coming Soon in Hindi…